वयाची पहिली सहा वर्षे मुलांसाठी महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:40+5:302021-02-06T04:25:40+5:30
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित बालक मंदिर व प्राथमिक विद्या मंदिर शिक्षकांसाठी आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेत शिक्षकांना ...
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित बालक मंदिर व प्राथमिक विद्या मंदिर शिक्षकांसाठी आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रुंगठा प्राथमिक विद्यामंदिरच्या मोहिनी देवी, नाशिकचे शालेय समिती अध्यक्ष शरद जाधव, नाशिक रोड शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी, संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, बालमंदिर समन्वयक सविता कुलकर्णी उपस्थित होते.
शरद जाधव यांनीही मार्गदर्शन केले. बाल मंदिर व पहिली-दुसरीच्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरण व ऑनलाईन शिक्षणाविषयी अनुभव सांगितले.
सविता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर जयश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अरुणा चोथवे यांनी परिचय करून दिला. कार्यकारी मंडळ सदस्य राहुल मुळे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी नवीन मराठी शाळा नाशिक रोड येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध बाल मंदिर व प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक उपस्थित होते.
बालकांच्या समग्र आणि सर्वांगीण विकासास उपयुक्त असणाऱ्या बारा व्यवस्था घर, वस्तू, संग्रहालय, प्राणी-पक्षी, कला शाळा, कार्यशाळा, प्रयोगशाळा, क्रीडांगण, बगिचा, पोहण्याचा तलाव, चित्र पुस्तकालय, प्रदर्शन खोली आदी गोष्टींचे उत्कृष्ट प्रदर्शन मांडण्यात आले होते.