‘पहिलं पाऊल’ जावळ्याच्या वाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:17+5:302021-07-14T04:18:17+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जावळ्याची वाडी हा आदिवासी पाडा मुसळधार पावसाचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दरवर्षी जोरदार पाऊस होतो. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जावळ्याची वाडी हा आदिवासी पाडा मुसळधार पावसाचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दरवर्षी जोरदार पाऊस होतो. अधिक पर्जन्यमानाच्या छायेत येणाऱ्या या पाड्यावर आदिवासी लोकवस्ती आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून नाशिक शहरातील सुशिक्षितांचा एक समूहाने ‘स्मार्ट स्टुडंट्स’ हा उपक्रम सालाबादप्रमाणे यंदाही राबविले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना एकत्र आणून त्यांना छत्री, शालेय साहित्य पेटीचे वाटप केले. यावेळी जमलेली मुले व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले होते. मागील वर्षी या उपक्रमाला कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे खंड पडला होता. शिक्षक शाळांमध्ये मुलांना शिकवू शकत नाही, त्यामुळे पाड्यावरील गल्लीत जाऊन काही प्रामाणिक शिक्षक आपले कर्तव्य बजावताना दिसतात. यामुळे येथील शालेय मुलांकडे शालेय साहित्यदेखील असणे आवश्यकच आहे, हे लक्षात घेऊन ‘पहिलं पाऊल’च्या चमूने वर्षभरासाठी जावळ्याची वाडीसह दुगारवाडी, कळमुस्ते, जांभुळवाडी, हर्षेवाडी या आदिवासी पाड्यांवर वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्य भेट म्हणून मुलांना वाटप केली.
--इन्फो--
ना वीज ना मोबाइलला रेंज, कसले ऑनलाइन शिक्षण?
कोरोनामुळे शाळा कुलूपबंद असून ऑनलाइन शिक्षणाचा शहरी भागात जरी गाजावाजा केला जात असला तरी आदिवासी दुर्गम पाड्यांवर मात्र ना वीज, ना मोबाइलला रेंज त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्नच येत नाही! येथील मुलांना जिद्दी शिक्षकांच्या ज्ञानदानाचा एकमेव आधार आहे.
110721\184711nsk_44_11072021_13.jpg
पहिलं पाऊल जावळ्याच्या वाडीवर