पहिलीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:16 AM2018-06-15T01:16:53+5:302018-06-15T01:16:53+5:30
नाशिक : इयत्ता पहिली आणि आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांचे वेळेवर वितरण होऊ न शकल्याने विभागीय भांडारांना पाठ्यपुस्तके मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विभागीय मंडळांकडे या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याने पहिलीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे मुख्य भांडार आणि विभागीय भांडारामध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे.
नाशिक : इयत्ता पहिली आणि आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांचे वेळेवर वितरण होऊ न शकल्याने विभागीय भांडारांना पाठ्यपुस्तके मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विभागीय मंडळांकडे या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याने पहिलीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे मुख्य भांडार आणि विभागीय भांडारामध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्या सर्व शिक्षा अभियानाला यामुळे खो बसला आहे. इयत्ता पहिली आणि आठवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके छपाई करून घेण्यास विलंब झाल्याने राज्यातील भांडारात या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचे समजते. याबरोबरच तिसरी, सहावी, पाचवी आणि आठवीच्यादेखील काही पुस्तकांचा अद्यापही पुरवठा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांना पुरेशी पुस्तके मिळण्याची शक्यता कमीच आहे. पहिलीच्या पुस्तके छपाईला विलंब झाल्याने पहिलीची पुस्तके वाटपासाठीची मुदत वाढवून घेण्यात आली होती. त्यानुसार १४ तारखेपर्यंत पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार होता, परंतु सायंकाळपर्यंत पाठ्यपुस्तकेच पोहचू न शकल्याने पहिल्याच दिवशी पहिलीच्या सर्वच मुलांना पुस्तके मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे.
इयत्ता पहिलीचे बालभारती, हिंदी बालभारती, उर्दू बालभारती, इंग्रजी बालभारती, माय इंग्लिश बुक, इंग्रजी, गणित ही पुस्तके अद्याप प्राप्त झाली नसल्याचे समजते. तर आठवीची मराठी, इतिहास-नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, उर्दू सामान्य विज्ञान, हिंदी सुलभभारती या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समजते. भांडारांना मागणी नोंदवूनही त्यांना पुरेसा पुरवठा होऊ शकलेला नाही.
पहिलीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून राहणार वंचित
(पान १ वरून)
त्यामुळे पाठ्यपुस्तके वितरण शंभर टक्के होण्यास अडचणी निर्माण झाली आहे. नाशिक येथील भांडारात पुरेशी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतानाही संबंधित केंद्रांना पाठ्यपुस्तके घेऊन जाण्याबाबत भांडाराने कळविल्याने एकच गोंधळ झाला. पाठ्यपुस्तके नसताना केंद्र आणि पुरवठादार यांनी मागणी केली, मात्र प्रत्यक्षात पाठ्यपुस्तके नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते. पाठ्यपुस्तके नसताना पुस्तके असल्याचा पत्रव्यवहार कसा करण्यात आला याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.
रात्री उशिरा पुरवठा शक्य
राज्यातील आठही विभागीय भांडारामार्फत तालुका पातळीवर पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा १४ तारखेला पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु राज्य मंडळाकडून पाठ्यपुस्तकांचा पुरेसा पुरवठा होऊ न शकल्याने तालुका केंद्रांना पुरेशी पाठ्यपुस्तके उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत सर्व पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी भांडारामध्ये पुस्तके पोहचतीलल असे सूत्रांनी सांगितले.व्यवस्थापकाकडून टाळाटाळपाठ्यपुस्तकांच्या तुटवड्याबाबत प्रभारी व्यवस्थापक साठा आणि वितरण, पुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुरवठा आणि वितरणाबाबत आपण काहीही बोलू शकणार नसल्याचे सांगून त्यांनी याप्रकरणी आपण संचालकांशी चर्चा करावी, असे सांगून बोलणे टाळले. त्यानुसार संचालकांच्या कार्यालयात संपर्क साधला असता साहेब मिटिंगमध्ये असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकाने सांगितले.