इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव येथील नवरात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:08 PM2020-10-05T19:08:03+5:302020-10-05T19:13:26+5:30
येवला : महाराष्ट्रासह गुजराथमध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सव यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
येवला : महाराष्ट्रासह गुजराथमध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सव यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री जगदंबा मातेचा नवरोत्रोत्सवनिमित्ताने यात्रोत्सव भरतो. महाराष्ट्रासह गुजराथ मधून भाविक नवरात्रोत्सवात दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने कोटमगावी येत असतात. यंदा मात्र कोरनामुमळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोटमगाव देवस्थान समिती सभागृहात नायब तहसीलदार राजेंद्र राऊत, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, ग्रामपंचायत प्रशासक चौधरी, ट्रस्ट अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब अदमाने, शरद लहरे, नानासाहेब लहरे आदींच्या उपस्थितीत यात्रोत्सव नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची घोषणा ट्रस्टच्या विश्वस्तांनी केली आहे.
दरम्यान, यात्रा काळात कलम १४४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून मंदिर परिसर सील करण्यात येणार आहे. यंदा भाविकांसाठी आॅनलाईन दर्शनाची सोय ट्रस्टच्या वतीने करून देण्यात येणार असून नवरात्रोत्सवादरम्यान, मंदिर आवारात दर्शनासाठी वा इतर कार्यक्र मासाठी प्रवेश करू नये अन्यथा कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले.