नाशकात प्रथमच रानगव्याने दिले दर्शन; कुतूहल अन् घबराहट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 02:55 PM2018-10-28T14:55:04+5:302018-10-28T15:01:37+5:30

वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी शिवारात आल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.

For the first time in the Nashik, the rāgvāna appeared; Curiosity and nervousness | नाशकात प्रथमच रानगव्याने दिले दर्शन; कुतूहल अन् घबराहट

नाशकात प्रथमच रानगव्याने दिले दर्शन; कुतूहल अन् घबराहट

Next
ठळक मुद्देवन्यप्राण्याचे अजस्त्र रुप पाहून धक्का बसलानागरिकांमध्ये हा कुतुहलाचा व काहीसा भीतीचा विषय ठरलारानगवा हा स्वभावाने शांत वन्यप्राणी

इंदिरानगर : अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन सैन्यदलाच्या जंगलाच्या दिशेने गव्याला पिटाळले.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.२८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रानगवा आढळून आल्याने प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये घबराट पसरली. रेड्यासमान अजस्त्र भारदार शरीराचा प्राणी भटकत असल्याचे काही गावक-यांना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी शिवारात आल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.


जाचक मळा येथील श्यामदर्शन व शिवपॅलेस या परिसरात रानगवा फेरफटका मारताना आढळून आला. सर्वप्रथम नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले;मात्र काही नागरिकांना त्या वन्यप्राण्याचे अजस्त्र रुप पाहून धक्का बसला. एवढा मोठा प्राणी अचानकपणे परिसरात अवतरल्याने नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली. आतापर्यंत बिबट्या या भागात दर्शन देत होता; मात्र यासोबतच रानगव्यासारख्या वन्यप्राण्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये हा कुतुहलाचा व काहीसा भीतीचा विषय ठरला. रानगवा हा स्वभावाने शांत वन्यप्राणी असल्यामुळे नागरिकांनी हेतूपुरस्सर त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नये, त्या प्राण्यापासून नागरिकांना तसा कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.

Web Title: For the first time in the Nashik, the rāgvāna appeared; Curiosity and nervousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.