सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 10:50 PM2020-10-17T22:50:42+5:302020-10-18T00:20:07+5:30
नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली.
नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली. यंदा कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक नवरात्रोत्सव रद्द करण्यात आल्याने पहिल्यांदाच परंपरा खंडित झाली.
कोरोनामुळे नवरात्रोत्सवासाची परंपरा खंडित झाल्याने भाविकांच्या जयघोषाने दुमदुमणारा मंदिर परिसरास सर्वत्र शांतता दिसून आली. मंदिरात गडावरील रहिवासी तसेच देवीभक्तांना घटस्थापना, महापूजा आदी धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्यास प्रशासनाने बंदी केल्यामुळे देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली. नवरात्रोत्सव घटस्थापना, अलंकार पूजा, धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवत करण्यात आले. पुरोहितवर्गाने पारंपरिक पद्धतीने देवीची पंचामृताने महापूजा केली. त्यानंतर भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या कार्यालयात अलंकारांची पूजा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात येऊन अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रोत्सव काळातील नियमित धार्मिक विधी, होमहवन पूजा, कीर्तिध्वजपूजन व ध्वजारोहण, दसरा उत्सव आदी कार्यक्रम कोरोनासंदर्भातील अत्यावश्यक नियमावली पाळून व नेमून दिलेल्या पुरोहितांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.