चणकापूरच्या पाण्यासाठी मेशीकरांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:16 PM2019-09-10T13:16:15+5:302019-09-10T13:16:43+5:30
मेशी : चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मेशी पाझर तलाव नं. १ टाकण्यसाठी बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मेशी गाव बंद करून देवळा -सौंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मेशी : चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मेशी पाझर तलाव नं. १ टाकण्यसाठी बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मेशी गाव बंद करून देवळा -सौंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मेशी गावास गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यांपासूनच टॅकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. या वर्षी अजूनही मेशी धरणात पाणी नाही. या धरणादवारे गावाची पाणी टंचाई दुर होते. या पाशर््वभूमीवर पाझर तलाव नं. १ मध्ये चणकापूर उजव्या वाढीव कालव्यातून पाणी टाकल्यास गावाचा पाणी प्रश्न सुटू शकतो. रामेश्वर धरण पूर्णपणे भरले आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित विभागाच्या अधिकारी यांना लेखी आणि तोंडी निवेदन देवूनही काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे दि. ११ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता देवळा पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मेशी गाव बंद ठेवून देवळा सौंदाणे (धोबीघाट) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आशयाचे निवेदन देवळा तहसीलदार, देवळा पाटबंधारे विभाग, देवळा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत अशी माहिती केदा शिरसाठ यांनी दिली आहे. निवेदनावर सरपंच सुनंदा अहिरे, उपसरपंच भिका बोरसे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.