मोटारसायकल चोरी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: January 16, 2017 01:01 AM2017-01-16T01:01:27+5:302017-01-16T01:01:40+5:30

मोटारसायकल चोरी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Five accused in motorcycle theft case | मोटारसायकल चोरी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

मोटारसायकल चोरी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Next


चांदवड : येथून बजाज कॅलिबर मोटारसायकल चोरी झाल्याने एका संशयितास चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले व तपास केला असता मोटारसायकल सापडली तर अजूनही पाच जण संशयित आढळून आल्याने चांदवड पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्याजवळून अजूनही चांदवड परिसरातून चोरी झालेल्या मोटारसायकल चोरी उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. ६ जानेवारी १७ रोजी वरचे गावातील शिंपी गल्लीतून अमोल पूनमचंद बिल्लाडे यांनी त्यांची बजाज कॅलिबर ही लाल रंगाची दहा हजार रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. एमएच १५ एपी ६११२) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद चांदवड पोलीस स्टेशनला दिली. चांदवड पोलिसांनी संशयावरून योगेश नारायण शिंदे (रा. फुलेनगर, चांदवड) यास ताब्यात घेतले. (वार्ताहर)

Web Title: Five accused in motorcycle theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.