शारदा सदन हिंसाचारातील पाच आरोपींना वर्षभराचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:19 AM2021-08-28T04:19:49+5:302021-08-28T04:19:49+5:30
पेठरोड येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह शारदा सदन येथील चौकीदार प्रशांत बाळकृष्ण पाटील ( ४०, रा. मंडलेचा कॉम्प्लेक्स ६०२, देशमुख ...
पेठरोड येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह शारदा सदन येथील चौकीदार प्रशांत बाळकृष्ण पाटील ( ४०, रा. मंडलेचा कॉम्प्लेक्स ६०२, देशमुख भवनसमोर जेलरोड) हे ड्युटीवर कार्यरत असताना आरोपी जयराम नामदेव वाघेरे (२६ रा.गोंदे ता. पेठ), जगदीश देवराम चौधरी ( १९, रा. कोठुळो ता. सुरगणा), गणेश रघुनाथ भोये (२२, रा. बिठुरपाडा ता. सुरगाणा), हिरामण ढवळू गाडर (२६ रा. बोंडरमाळ पो.भुवन) व निवृत्ती यशवंत महाले (२२, रा. आड बु.ता. पेठ) यांनी पोलीस उपायुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लघंन करून गैरकायद्याची मंडळी जमवून प्रशांत पाटील व गृहपाल राठोड यांना धक्काबुक्की करून मारहाण केली होती, तसेच तेथे आलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा व अंबर दिवा फोडला होता. या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी. जी. मुळे यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गुरुवारी (दि.२६) आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.