लखमापूरला पाच एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:24 AM2018-02-24T00:24:04+5:302018-02-24T00:24:04+5:30

लखमापूर येथे शॉर्टसर्किटने येथील कल्पना मोगल व मनूबाई मोगल यांच्या गट क्रमांक २३३ मधील सुमारे पाच एकर ऊस जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

 Five acres of sugarcane in Lakhmapur | लखमापूरला पाच एकर ऊस खाक

लखमापूरला पाच एकर ऊस खाक

Next

दिंडोरी : लखमापूर येथे शॉर्टसर्किटने येथील कल्पना मोगल व मनूबाई मोगल यांच्या गट क्रमांक २३३ मधील सुमारे पाच एकर ऊस जळाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.  शुक्रवारी सकाळी मोगल यांच्या शेतातून एव्हरेस्ट इंडस्ट्रीजला वीजपुरवठा करणाºया उच्च दाबवाहिनीच्या खांबावरील तारेचा जम्प (दोन वायर जोडणारी) तुटल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे थिनग्या पडल्याने उसाच्या शेताला आग लागली. आग इतकी भीषण होती की ऊसपीक वाचविण्याचे सर्व पर्याय विफल ठरले. यात क्षणार्धात संपूर्ण ऊस जाळून खाक झाला.  नुकसानग्रस्त शेताला कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गट आॅफिसचे अधिकारी जाधव, कोंड, तलाठी नंदकुमार गोसावी, कृषी सहाय्यक संदीप बोरावे, वणी पोलीस स्टेशनचे पारखे, शार्दूल, जाधव वीज वितरण कंपनीचे मोरे यांनी  पहाणी करून पंचनामा केला. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळेच पोलवरील जंप तुटून उसाला आग लागली.  यात झालेल्या नुकसानीला वितरण कंपनीच जबाबदार असून, नुकसानीची भरपाई देण्याची मागणी मनूबाई मोगल व कल्पना मोगल या महिला शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  Five acres of sugarcane in Lakhmapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा