महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात साडेपाच कोटी

By admin | Published: November 12, 2016 02:21 AM2016-11-12T02:21:30+5:302016-11-12T02:23:26+5:30

करवसुली : भरणा करण्यासाठी लागल्या रांगा

Five-and-a-half million rupees in the treasury of the municipality | महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात साडेपाच कोटी

महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात साडेपाच कोटी

Next

नाशिक : नाशिक महानगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केल्याने शुक्रवारी (दि. ११) सायंकाळपर्यंत महापालिकेच्या खजिन्यात सुमारे पाच कोटी ५८ लाख रुपयांची वसुली झाली. मध्यरात्रीपर्यंत बिलिंग काउंटर खुले ठेवले जाणार असल्याने वसुलीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर भरणा करण्यासाठी नागरिकांच्या बिलिंग सेंटरवर रांगा लागल्या होत्या.
राज्य शासनाने महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने गुरुवारी दुपारी २ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बिलिंग काउंटर सुरू ठेवले. या दहा तासांमध्ये महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून ६१ लाख २३ हजार रुपये तर पाणीपट्टीच्या माध्यमातून चार लाख ८४ हजार रुपये जमा झाले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासूनच महापालिकेने बिलिंग काउंटर सुरू केले. महापालिकेच्या सहाही विभागांतील केंद्रांसह एकूण १८ ठिकाणी बिलिंग सेंटरची व्यवस्था आहे. सर्व ठिकाणी महापालिकेने अतिरिक्त काउंटर देत करदात्यांना सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वच केंद्रांवर महापालिकेने वसुलीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्याही नेमणुका केल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन कोटी ६७ लाख घरपट्टी तर ६३ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली होती. याशिवाय, विविध कर आणि नगररचना विभागाच्या माध्यमातून आकारले जाणार कर मिळून महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात सुमारे साडेपाच कोटी रुपये जमा झाल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

Web Title: Five-and-a-half million rupees in the treasury of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.