पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

By admin | Published: September 8, 2014 12:55 AM2014-09-08T00:55:30+5:302014-09-08T00:57:17+5:30

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

Five Attacks: Tensions in the City | पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

पाच अटकेत : शहरात तणावाचे वातावरण

Next


ंमनमाडला दोन गटांतील हाणामारीत एकाचा मृत्यूमनमाड : गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली. उत्सवाला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पोलीस बंदोबस्तात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
येथील इदगाह भागात असलेल्या गणराज गणेश मंडळासमोर शनिवारी रात्री विविध कार्यक्रम सुरू होते. नगरसेवक अमिन पटेल यांच्यासह १३ जणांनी या ठिकाणी येत येथे उभ्या असलेल्या राहुल कन्हैयालाल चुनियान (१७) यास मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत चाकू व कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मृताचा भाऊ शुभम चुनियान याने मनमाड पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी संशयित अमिन कासम शेख (पटेल), जाकीर शेख, मतीत गुलाम शहा, सद्दाम बादशहा अत्तार, असीफ पटेल, सोहेल जाकीर शेख, अरबाज, जाबाज, रज्जू (तिघांची पुर्ण नावे माहीत नाही), लाला पटेल, समील रफीक पठाण, सोहेब उर्फ मोन्या जाकीर शेख व अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून अमिन कासम शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज चुनियान, योगेश रतन चुनियान, शुभम कन्हैयालाल चुनियान, प्रकाश दिलीप खडांगळे, ललित मनीष पाठक, संदीप मधुकर कांबळे, सोनू मंगवाना, संजय चिंडालीया व अन्य आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन हे रात्रीपासूनच शहरात तळ ठोकून आहेत. रुगणालयात पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी, निरीक्षक भागवत सोनवणे यांनी बंदोबस्त ठेवला होता. मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव, कळवण येथील पोलीस कुमक व राज्य राखीव दलाच्या जवानाच्या तुकड्यांना शहरात बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. मृत राहुल याचा मृतदेह बंदोबस्तात निवास्थानी नेण्यात आला. या ठिकाणी नातेवाइकांनी शवविच्छेदन अहवाल व एफआयआर प्रत मिळाल्या शिवाय अंत्ययात्रा काढणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Five Attacks: Tensions in the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.