वाडीवºहेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:27 AM2019-06-12T01:27:53+5:302019-06-12T01:29:10+5:30

इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बिनविरोध झाल्याने सोळा जागांसाठी ४२ उमेदवार, तर सरपंचपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.

Five candidates for the post of Sarpanch | वाडीवºहेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार

वाडीवºहेत सरपंचपदासाठी पाच उमेदवार

Next

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बिनविरोध झाल्याने सोळा जागांसाठी ४२ उमेदवार, तर सरपंचपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.
औद्योगिक ग्रामपंचायत असल्याने उत्पन्नाच्या बाबतीतही अग्रेसर असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी होती. १७ सदस्य पदांकरिता ७१ अर्ज प्राप्त झाले होते. माघारीनंतर प्रभाग क्र . ६ मधील सर्वसाधारण पुरु ष या एक जागेवर प्रवीण विष्णू मालुंजकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उर्वरित १६ जागांकरिता ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सरपंचपदासाठी तब्बल १७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात माघारीनंतर ५ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Five candidates for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.