‘सन १९८१’ चित्रपटात बागलाण मधील ५ कलाकारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 06:08 PM2019-01-30T18:08:23+5:302019-01-30T18:09:06+5:30

वीरगाव : तालुक्यातील भूमीपुत्रांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सन १९८१’ हा मराठी चित्रपट शुक्र वारी (दिं. 1 फेब्रु.) संपूर्ण महाराष्ट्रभराबरोबरच बागलाण तालुक्यातील सिनेमागृहातही प्रदिक्षत होत आहे. पिहल्यांदाच बागलाण तालुक्यातील पाच कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या असून मायभूमीतीलच प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून हा चित्रपट दिग्दिर्शत करण्यात आला आहे.

Five cast members of Baglan in the film '1981' | ‘सन १९८१’ चित्रपटात बागलाण मधील ५ कलाकारांचा सहभाग

‘सन १९८१’ चित्रपटात बागलाण मधील ५ कलाकारांचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देबागलाण तालुक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने खास मेजवानीच ठरणार

वीरगाव : तालुक्यातील भूमीपुत्रांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सन १९८१’ हा मराठी चित्रपट शुक्र वारी (दिं. 1 फेब्रु.) संपूर्ण महाराष्ट्रभराबरोबरच बागलाण तालुक्यातील सिनेमागृहातही प्रदिक्षत होत आहे. पिहल्यांदाच बागलाण तालुक्यातील पाच कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या असून मायभूमीतीलच प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून हा चित्रपट दिग्दिर्शत करण्यात आला आहे. यामुळे हा चित्रपट बागलाण तालुक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने खास मेजवानीच ठरणार आहे.
शिवा बागुल दिग्दर्शित व एस. के. आर्ट्स प्रस्तुत ‘सन १९८१’ (प्रेम करण पाप नाही) या चित्रपटात बागलाण तालुक्यातील कलाकर प्रशांत महाजन, जायखेडा येथील नवोदीत कलाकार चैतन्य बागुल, मुंजवाड येथील सार्थक जाधव, चौंधाणे येथील खुशी बागुल व दिशा बागुल या बालकलाकारांच्या प्रमुख भुमिका असून शुक्र वारी (दि.१) हा चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध होत आहे.
याच अनुषंगाने सदर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात असुन प्रदिर्शत होण्यापुर्वीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, नागेश भोसले, सुनिल गोडबोले, जयमाला इनामदार यासारख्या दिग्गज तर योगेश तनपुरे, राधिका देशमुख या सारख्या नवोदित कलाकारांनी भुमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील गाणे नामवंत गायक आदर्श शिंदे यांनी गायीले असुन संगीत पराग फडकर यांचे आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेले सिने कलाकार प्रशांत महाजन यांनी अनेक लघुपट तसेच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर दिग्दर्शक शिवा बागुल हेही तालुक्यातही चौंधाने येथील रहिवाशी असून अनेक लघूपटांबरोबरच अनेक छोटया बजेटच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
चित्रपटाचा विषय हा ग्रामिण भागाशी निगडीत असल्याने या त्याचे चित्रीकरणही ग्रामीण भागातच करण्यात आले आहे. या चित्रपटाला निफ फिल्म फेस्टिवल मध्येही दोन पुरस्कार मिळाले आहेत.
(फोटो सन १९८१)

Web Title: Five cast members of Baglan in the film '1981'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला