पाच मतदारसंघ अजूनही रेडझोनमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:42 PM2020-02-12T23:42:45+5:302020-02-12T23:48:23+5:30
राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेचा गुरुवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, अजूनही पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्यची बाब समोर आली आहे.
नाशिक : राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेचा गुरुवारी (दि.१३) अखेरचा दिवस असून, अजूनही पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्यची बाब समोर आली आहे. जिल्ह्णातील पडताळणीची एकूण टक्केवारी ९१ टक्के असली तरी सातत्याने टक्केवारी कमी असणाऱ्या मतदारसंघातील टक्केवारी अपेक्षित कामे होऊ शकलेली नाहीत.
जिल्ह्णातील १५ मतदारसंघांत ४५ लाख ६२ हजार ५७१ मतदारांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेने हातात घेतले होते.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या पडताळणी कार्यक्रमाची मुदत २० डिसेंबर २०१९ पर्यंत होती. परंतु अपेक्षित कामे होऊ न शकल्याने मतदार कर्मचाऱ्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. सदर मुदत एका दिवसात संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी म्हणजे बुधवार (दि.१२) रोजी पडताळणी कामाची माहिती घेतली असता. जिल्ह्णात ९१ टक्के पडताळणीचे काम झाल्याचे दिसून आले. परंतु नाशिक पूर्व, देवळाली, कळवण, मालेगाव मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ८४ ते ९० टक्के दरम्यानच राहिल्याने हे पाचही मतदारसंघ रेडझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत काम करणाºया बीएलओंच्या कामाचे मूल्यमापन होण्याची दाट शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात मतदार पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्णात नोव्हेंबरपासून पडताळणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र या कामाला अपेक्षित गती मिळालेली नव्हती. निवडणूक शाखेने बीएलओ कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कामाची गती वाढली. सोमवारपर्यंत ८४ टक्के असलेले काम गुरुवारी ९१ टक्केपर्यंत पोहचले, मात्र अजूनही तीन लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान निवडणूक कर्मचाºयांपुढे आहे.
१८१ स्थलांतरितांपैकी १२ मतदार मयत
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या मतदार पडताळणीच्या कार्यक्रमात मतदारांची माहिती भरून घेताना १८१ मतदारांनी जिल्ह्यातून स्थलांतर केल्याची बाब समोर आलेली आहे. अनेकविध कारणांनी स्थलांतरित करण्यात आलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत तर गेल्या तीन महिन्यांत १२ मतदारांचा मृत्यू झाल्याचीही नोंद मतदार कर्मचाºयांकडे झाली आहे. सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक नवमतदारांचीदेखील नोंदणी या उपक्रमातून झाली आहे.
मतदारसंघनिहाय पडताळणीची टक्केवारी
निफाड : ९७.१५
दिंडोरी : ९४.९२
चांदवड : ९४.६८
इगतपुरी : ९४.५०
सिन्नर : ९४.२९
नांदगाव : ९३.४४
नाशिक मध्य : ९२.५९
मालेगाव : ९१.४३
मालेगाव बाह्य : ९१.४३
बागलाण : ९१.१२
येवला : ९१.०४
नाशिक पूर्व : ९०.७९
देवळाली : ९०.४७
कळवण : ९०.२७
मालेगाव मध्य : ८५.४४
नाशिक पश्चिम : ८४.३०