एकाच कुटूंबातील पाच कोरोना योद्धे बनले जीवनमित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:41 PM2020-09-12T22:41:31+5:302020-09-13T00:16:19+5:30
अभोणा (सुभाष शहा ): कळवण, सुरगाणा तालुक्याच्या सिमा रेषेवर वसलेले शंभरटक्के आदिवासींची वस्ती असलेल्या सुकापूर गावातील एकाच कुटुंबातील आरोग्य सेवेत असलेले पाच कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्याचे कार्य मुंबापुरीत गेल्या आठ महिन्यांपासून अहोरात्र करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे तालुक्यासह सर्वत्र कौतूक होत आहे.

राज्यात सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई महानगरातील केईएम,नायर व सायन हॉस्पिटलमध्ये सुकापुरचे युवराज चिंतामण दळवी, संगिता युवराज दळवी,कैलास चिंतामण
दळवी, शानु कैलास दळवी तसेच योगेश किसन दळवी हे कोविड कक्षात स्वत:चा जीव धोक्यात घालून बाधितांवर उपचार करणे, त्यांना धीर देणे, उपचारासह समुपदेशन करीत रुग्णांना रिकव्हर करणे आदी वैद्यकीय कामात अहोरात्र झटत आहेत. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात भल्या-भल्यांनी सेवा करण्याचे नाकारले पण तालुक्यातील हे कोरोना योद्धे मागे हटले नाही. किंवा स्वत:च्या गावीही परतले नाहीत.याउलट सतत रुग्ण सेवेत राहून कोरोना ग्रस्थांचे जीव वाचविण्याचे पवित्र कार्य विना तक्रार करीत आहेत.
राज्यात कोव्हिड-१९ विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध पाताळीवर शर्थीचे प्रयत्न व उपाययोजना करत आहे. हे युद्ध जिंकायचे अशा जिद्दीला पेटलेले डॉक्टर,परिचारीका, ,आरोग्यसेवक, सफाईकामगार,पोलीस हे कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी स्वत:चा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून देवदूताप्रमाणे इतरांचे प्राण वाचवित आहेत.