लासलगावी पाच जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 09:53 PM2020-05-19T21:53:37+5:302020-05-20T00:02:24+5:30

लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रात दाखल झालेले पाच कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १९) दुपारी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात टाळ्या वाजवत घरी सोडण्यात आले.

Five coroners released in Lasalgaon | लासलगावी पाच जण कोरोनामुक्त

लासलगावी पाच जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देरुग्णालयातून डिस्चार्ज : टाळ्या वाजवून निरोप

लासलगाव: येथील कोरोना कोविड उपचार केंद्रात दाखल झालेले पाच कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १९) दुपारी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात टाळ्या वाजवत घरी सोडण्यात आले.
निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे, निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, लासलगाव कोरोना कोविड कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांच्यासह आरोग्य कर्मचारी व सेविका यावेळी उपस्थित होत्या.
नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निफाड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णाची संख्या वाढल्यामुळे लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष कोरोना कोवीड कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी सहा कोरोना पॉझीटीव्ह रूग्णावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर डॉ. राजाराम शेंद्रे यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. सदर रुग्ण बरे झाल्याने डॉ. शेंद्रे यांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Five coroners released in Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.