गोंदेश्वर मंदिरासाठी पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:09+5:302021-05-06T04:16:09+5:30
१२ व्या शतकात गोविंदराज यादव या राजाने दक्षिणेत प्रसिद्ध असलेल्या भूमिज स्थापत्यशैलीत या मंदिराचे काम केले. केंद्र सरकारने पुढे ...
१२ व्या शतकात गोविंदराज यादव या राजाने दक्षिणेत प्रसिद्ध असलेल्या भूमिज स्थापत्यशैलीत या मंदिराचे काम केले. केंद्र सरकारने पुढे या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरास 'महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक' असा दर्जा दिला. अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. मात्र कालौघात या ठिकाणी शासनाकडून फारशा सुविधा दिल्या गेल्या नाही. आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या २००९ ते २०१४ या काळात या मंदिराचे पर्यटनदृष्ट्या सुशोभिकरण करून परिसरात सुविधा देण्याचे काम हाती घेतले होते. मात्र मधल्या काळात हे काम रखडले. दरम्यान, मार्च महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आठ प्राचीन मंदिरांमध्ये गोंदेश्वर मंदिराचा समावेश करून या मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नुकताच राज्य सरकारने नगरविकास विभागाने पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये वितरणाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लवकरच विकासकामे सुरू होणार आहेत.
चौकट-
५० कोटींची कामे होणार
पुणे-नाशिक महामार्गावरचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र व जवळूनच जात असलेला समृद्धी महामार्ग, प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे सेवा यामुळे सिन्नर चर्चेत आले आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी मिळाला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ५० कोटी रुपयांची मागणी आमदार कोकाटे यांनी केली आहे. त्यानुसार कोकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास ५० कोटी रुपयांचा डीपीआर बनविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
ही कामे होणार.....
वैशिष्ट्यपूर्ण लाइट बसविणे, ॲम्पिथिएटर बांधणे, जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, तळ्यात संगीत कारंजे बसविणे, मंदिराचे सुशोभिकरण, पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा निर्माण करणे आदी महत्त्वपूर्ण कामे या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे उत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ होताच पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
फोटो- ०५ गोंदेश्वर टेम्पल
===Photopath===
050521\05nsk_48_05052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ गोंदेश्वर टेम्पल