येवला शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:03 PM2020-02-28T18:03:52+5:302020-02-28T18:04:04+5:30

एकूण २० कामे : शासनाकडून सुविधांसाठी विशेष अनुदान

 Five crore funds for Yeola city development | येवला शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी

येवला शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपरिषदांना प्राथमिक सोयी सुविधांच्या विकासकामांसाठी विशेष अनुदान

येवला : नगरपरिषदांना प्राथमिक सोयी सुविधांच्या विकासकामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत येवला नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामांसाठी शासनाकडून ५ कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरात एकूण २० विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्यानुसार सदर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत येवला शहरातील आनंदनगर गणपती मंदिराजवळ तसेच पटेल कॉलनी, राधाकृष्ण मंदिराजवळ सामाजिक सभागृह, बगीचा आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकी २५ लक्ष, धोंडीराम वस्ताद तालीम व्यायामशाळा बांधण्यासाठी २० लक्ष, श्रीरामनगर कॉलनी येथे ग्रीन जीम विकसित करण्यासाठी ३० लक्ष, संतोषी माता नगर येथे सामाजिक सभागृह तसेच बगीचा विकसित करण्यासाठी ३० लक्ष, क्र ीडा संकुल येथे खुली व्यायामशाळा ग्रीन जीम विकसित करण्यासाठी ४० लक्ष, प्रभाग क्रमांक ४ येथे ओपन स्पेस मध्ये बगीचा विकसित करण्यासाठी २५ लक्ष, प्रभाग क्र .६ मध्ये मोकळ्या जागेत बगीचा विकसित करण्यासाठी व जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी २० लक्ष रु पये निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच प्रभाग क्र . ८ श्रीराम कॉलनी येथील मोकळ्या जागेत बगीचा विकसित करण्यासाठी व जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी २० लक्ष, प्रभाग क्र .१२ येथे लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड व शेड तयार करण्यासाठी २५ लक्ष, प्रभाग क्र .८ येथे स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत बगीचा विकसित करण्यासाठी १५ लक्ष, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी व पांडुरंग नगर येथे बगीचा व ग्रीन जीमसाठी प्रत्येकी २० लक्ष, प्रभाग क्र .९ गोविंद नगर येथील मोकळ्या जागेत बगीचा, लहान मुलांच्या खेळणी साहित्यांसह जॉगिग ट्रॅक व लोकसेवा केंद्रासाठी ३० लक्ष, पटेल कॉलनी येथे मोकळ्या जागेत बगीचा व जॉगिंग ट्रॅकसाठी २० लक्ष, प्रभाग क्र . १२ वल्लभ नगर भागातील दाते पोलीस घरासमोरील मोकळ्या जागेत बगीचासाठी १५ लक्ष याप्रमाणे निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title:  Five crore funds for Yeola city development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक