मानूर केंद्राला ऑक्सिजनचे पाच सिलिंडर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 10:25 PM2021-05-05T22:25:05+5:302021-05-06T01:17:18+5:30

पाळे खुर्द : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत कळवणच्या आदिवासी भागात मानूर येथील डीसीएचसी सेंटरला लंडन येथे वास्तव्यास असलेले डॉ. अभिमन्यू कोहक यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन सिलिंडर रुग्णसेवेसाठी भेट देण्यात आले.

Five cylinders of oxygen donated to Manor Center | मानूर केंद्राला ऑक्सिजनचे पाच सिलिंडर भेट

मानूर केंद्राला ऑक्सिजनचे पाच सिलिंडर भेट

Next
ठळक मुद्देपाच ऑक्सिजन सिलिंडर रुग्णसेवेसाठी भेट

पाळे खुर्द : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत कळवणच्या आदिवासी भागात मानूर येथील डीसीएचसी सेंटरला लंडन येथे वास्तव्यास असलेले डॉ. अभिमन्यू कोहक यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन सिलिंडर रुग्णसेवेसाठी भेट देण्यात आले.
मानूर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. समीर पवार यांच्याद्वारे सदर मदतीची उपाययोजना करण्यात आली. डॉ. समीर पवार यांना कळवण आदिवासीबहुल भागातील परिस्थिती चांगली ज्ञात असल्याने त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरसाठी परिश्रम घेतले. सदर सिलिंडर डॉ. अभिमन्यू कोहक (लंडन) यांच्याकडून घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना व कळवण उपजिल्हा रुग्णालय अधिकारी, कर्मचारी व मानूर गावचे नितीन पवार, मधुकर पवार, शेखर पवार, गोपी बोरसे, तुषार बोरसे आदींच्या उपस्थितीमध्ये सुपुर्द करण्यात आले. 

Web Title: Five cylinders of oxygen donated to Manor Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.