इगतपुरीत पाच दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:24 PM2020-06-19T16:24:35+5:302020-06-19T16:24:58+5:30
इगतपुरी : शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने शहर पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. ...
इगतपुरी : शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने शहर पाच दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांपासुन करोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची गंभीरता लक्षात घेत काल तहसील कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. कोरोनाला आळा बसावा म्हणुन इगतपुरी शहर शनिवार दि. २० जुनपासुन पाच दिवस कडकडीत बंद ठेवणार असल्याचा निर्णय नगराध्यक्ष संजय इंदूलकर यांनी या बैठकीत सांगितला.
दररोज कोरोना पॉझिटीव्ह रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन शहरातील कोरोनाचे आज एकाच कुटूंबातील दोन रु ग्ण बाधीत मिळाले असून त्यात एक चार वर्षाचा मुलगा आहे. शहरात रु ग्णांची संख्या १६ तर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २६ झाली आहे. कोरोना रु ग्ण बाधीत असलेला भाग नगरपरिषदेने सील केला आहे. वाढत चाललेली रु ग्ण संख्या पाहुन यावर उपाय म्हणुन शहर पाच दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्ष संजय इंदुलकर, प्रभारी नगराध्यक्ष नईम खान यांनी घेतला आहे. पाच दिवसाच्या बंद काळात मेडीकला सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.
या बैठकीस मुख्याधिकारी निर्मला गायकवाड- पेखळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, नगरसेवक उमेश कस्तुरे, नगरसेविका सिमा जाधव, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डॉ. प्रदीप बागल, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर आदी उपस्थित होते.