पिंपळगाव शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:02 AM2021-04-04T00:02:45+5:302021-04-04T00:28:43+5:30

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याप्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार दि. ७ एप्रिलपासून ते ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने शनिवारी (दि. ३) बैठकीत घेतला आहे.

Five days public curfew in Pimpalgaon city | पिंपळगाव शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू

पिंपळगाव शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्त्वाची व्यापारी बाजार पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात मार्च महिन्याप्रारंभीपासून कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात बुधवार दि. ७ एप्रिलपासून ते ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांचा कडकडतीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने शनिवारी (दि. ३) बैठकीत घेतला आहे.

शहरात कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण व उपाययोजनासाठी शहरातील अग्निशामक विभाग कार्यालयात ग्रामपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक व्यापारी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी ग्रामपालिका सरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, किरण लभडे, अल्पेश पारख, बापू कडाळे, सुरेश गायकवाड, बाळा बनकर, दीपक विधाते, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींसह शहर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपालिका, महसूल, पोलीस प्रशासनासह स्थानिक व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पिंपळगाव शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याबाबत व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात अली.
व्यापारी वर्गाने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नो मास्क, नो एन्ट्री, फिजिकल डिस्टनसिंगचे व कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. शिवाय सर्वानुमते झालेल्या चर्चेअंती शहरात बुधवारपासून ते रविवारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ५ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या निर्णयास सर्व व्यापाऱ्यांनी एकमत दर्शविल्याने बंद काळात पिंपळगावकरांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने यावेळी केले. 

Web Title: Five days public curfew in Pimpalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.