पाच वर्षांपासून ५२ ईव्हीएम यंत्रे सीलबंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:02 AM2019-09-26T01:02:26+5:302019-09-26T01:02:42+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची आठ वार्डांची निवडणूक दि. ११ जानेवारी २०१५ रोजी होऊन आठ नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. निवडणूक निकालानंतर वार्ड क्र मांक एक, दोन, पाच व सहाच्या मतदानाच्या निकालाबाबत पराभूत उमेदवारांनी कोर्टात धाव घेत निवडणूक प्रक्रि येस हरकत घेतली होती. सदर निवडणुकीला पाच वर्ष पूर्ण होत आलेले असतानाही अद्याप सुनावणी पूर्ण न झाल्याने निवडणुकीत वापरण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे जैसे थे ठेवल्याने खर्चाचा भार वाढतच आहे. सदर ईव्हीएम यंत्रांबाबत बंदोबस्तासाठी दररोज चार पोलीस कर्मचारी तैनात करावे लागत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रि येत ईव्हीएम कमी असतानाही देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयातील मशीन सीलबंद खोलीत तसेच होते. विधानसभा निवडणुकीत तरी न्यायालयीन प्रक्रियेची वाट बघत असलेले ५२ ईव्हीएमचा वापराबाबत शंकाच निर्माण होत आहे. सदर ईव्हीएम यंत्रे बंदोबस्तात ठेवण्यासाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च कोणाकडून वसूल करावा, हाही प्रश्न प्रशासनाला पडत असून, निवडणूक शाखा की कॅन्टोन्मेंट बोर्ड याबाबत माहिती देण्यास कार्यालयाकडून असमर्थता दाखविण्यात आली. न्यायालयाने सदर ईव्हीएम जैसे थे ठेवण्याच्या आदेशानुसार सदर यंत्रे आहे त्या स्थितीत सील करून ठेवण्यात आल्याची माहिती संबंधितानी दिली.
२०१५ला निवडणूक प्रकियेदरम्यान न्यायालयात गेलेल्या तक्र ारीनुसार ती ईव्हीएम यंत्रे जैसे थे ठेवण्यात आली असली याबाबत जलद न्यायाची अपेक्षा असताना पाच वर्षांच्या कालावधीत काही झालेले नाही, उलट त्याकामी होणारा खर्च प्रशासन सामान्य नागरिकांकडून वसूल करून पैसा वाया जात आहे.
- गुंडाप्पा देवकर