छोट्या छोट्या उपायांमधून वाचू शकते पाच ते टक्के वीज: जनवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:23 AM2019-12-22T00:23:07+5:302019-12-22T00:25:29+5:30
नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले.
नाशिक- सध्या मुबलक वीज उपलब्ध असल्याने भारनियमनाचे चटके बसत नसले तरी म्हणून वीजेची बचत करणे अनावश्यक आहे असे नाही. नैसर्गिक इंधनाचे साठे मर्यादीत असल्याने वीज बचत केली पाहिजे असे मत महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी व्यक्त केले. सध्या राष्टÑीय उर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न- वीज मुबलक असल्याने सध्या बचतीची गरज काय असा एक प्रश्न केला जात आहे. त्याविषयी काय सांगाल?
जनवीर- वीज ही माणसाची प्राथमिक गरज आहे. ती सध्या उपबल्ध असली तरी नैसर्गिक साधन सामग्री मर्यादीत आहे इंधनाचे साठे कधी तरी संपतील, वीजेच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा वापरला जातो आणि वीजेचा अव्याहत वापर केला की तो संपु शकतो, त्यामुळे वीजेचा वापर काटकसरीनेच केला पाहीजे
प्रश्न- वीज बचतीसाठी नेमके काय केले पाहिजे असे वाटते?
जनवीर- आपल्या आयुष्याती निम्मी कामे वीजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे गरजेचे पुरताच वीजेचा वापर केला पाहिजे. वीज बचतीसाठी खूप परीश्रम घ्यावे लागत नाही. छोट्या छोट्या उपायांमधुन पाच ते दहा टक्के वीज वाचवता येईल. वीज वापराचा अचूक हिशेब ठेवल्यास बचतीची सवय लागू शकते. एक युनीट वीजेची बचत म्हणजे दोन युनीटची निर्मिती असते हे साधे सुत्र लक्षात घेतले पाहिजे.
मुलाखत- संदीप भालेराव