नाशिकला पाच सुवर्ण; तीन रजत  राज्यस्तरीय कयाकिंग स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:45 AM2018-01-29T00:45:25+5:302018-01-29T00:45:47+5:30

महाराष्टÑ असोसिएशन फॉर कॅनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग यांच्यामार्फत कॅनो कयाकिंग असोसिएशन आॅफ इंडिया या जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय केनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकने आठ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पाच सुवर्ण आणि तीन रजतपदकांचा समावेश आहे.

Five Golds in Nashik; Three silver state-level kayaking competition | नाशिकला पाच सुवर्ण; तीन रजत  राज्यस्तरीय कयाकिंग स्पर्धा

नाशिकला पाच सुवर्ण; तीन रजत  राज्यस्तरीय कयाकिंग स्पर्धा

Next

नाशिक : महाराष्टÑ असोसिएशन फॉर कॅनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग यांच्यामार्फत कॅनो कयाकिंग असोसिएशन आॅफ इंडिया या जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय केनोर्इंग अ‍ॅण्ड कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकने आठ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये पाच सुवर्ण आणि तीन रजतपदकांचा समावेश आहे.  केटीएचएम महाविद्यालयाच्या बोटक्लबवर गेल्या शुक्रवारपासून या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १००० मीटरच्या कयाकिंग व   कनोर्इंग या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये यजमान नाशिक जिल्ह्णाने अपेक्षित कामगिरी करीत पाच सुवर्ण आणि तीन रजत पदकांची कमाई केली. जळगाव जिल्ह्णाने दोन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्य पदके पटकाविली, तर परभणी जिल्ह्णाने एक सुवर्ण, पाच रजत, तर एक कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २६ जिल्ह्णांपैकी नाशिक, जळगाव आणि परभणी जिल्ह्णाने नेत्रदीपक कामगिरी केली.  या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले आहेत. सदर स्पर्देत पंच म्हणून सुनील धोंडगे, सचिन काकड, बाबा राकेले, समाधान केंग, हिराजी मुंडे, शिंदे, प्रवीण शेळके, संजय घरजाळे यांनी कामकाज पाहिले, अशी माहिती संघटनेचे सचिव व स्पर्धा आयोजक जितेंद्र कर्डेल यांनी दिली. पुरुषांच्या खुल्या गटात बीड, नंदुरबार येथील खेळाडूंनीदेखील उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांची कमाई केली. महिला गटातही कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव आणि कोल्हापूरच्या खेळाडूंची कामगिरी पदकविजेती ठरली.
 

Web Title: Five Golds in Nashik; Three silver state-level kayaking competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा