नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे कोटींचा घोटाळा, थेट ईडीकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:41 PM2022-01-12T16:41:52+5:302022-01-12T16:44:45+5:30
नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली आहे. मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भाजपाचे ज्येेेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी तक्रार केली आहे. ईडीने या प्रकारची गांर्भीयाने दखल घेतलीच तर देवीदास पिंगळे यांच्यावर सक्रांत असणार आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. मात्र आता पुन्हा पिंगळे यांच्याच ताब्यात ही समिती आहे. त्यांच्या आणखी एका सत्ता स्थानाला म्हणजेच गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्याचे काम भाजपाचे ज्येेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराच्या विरोधात लढणारे सध्या भाजपचे शहर सरचिटणीस असलेले सुनील केदार यांनी एकत्र येऊन बुधवारी (दि.१२) बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली. महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यातील यंत्रणा निष्पक्षपणे चौकशी करतील अशी खात्री नसल्यानेच ही तक्रार थेय ईडीकडे करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१३-१४ या वर्षाातील लेखा परीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपातून सुमारे पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, असा दावा दिनकर पाटील आणि सुनील केदार यांनी केला आहे. लेखा परीक्षणासह अन्य कागदपत्रेही पुरावा म्हणून त्यांनी ईडीला सादर केली आहेत. गेली २० वर्षे पिंगळे यांच्याकडे सत्ता असून त्यामुळेच घेाटाळ्याचा एकंदर हिशेब बघितला तर अब्जावधी रूपयांचा घोटाळा आहे, असेही त्यात नमूद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शेतकरी तसेच बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या संबंधीतांच्या विरोधात कारवाई करावी असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.