दोन कारच्या धडकेत पाच जखमी
By admin | Published: May 23, 2017 09:47 PM2017-05-23T21:47:49+5:302017-05-23T21:47:49+5:30
समांतर रस्त्याने भरधाव आलेल्या वॅगनर कारने हुलकावणी दिल्याने मारुती कार उलटून पाच जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : समांतर रस्त्याने भरधाव आलेल्या वॅगनर कारने हुलकावणी दिल्याने मारुती कार उलटून पाच जण जखमी झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी (दि़२०) सायंकाळी घडली़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास वडाळागावातील अलनी रहिम शेख, साकिर तुमान्न शहा, चांद रतुल शहा, मयूर जगताप व अहमद रज्जा सय्यद हे मारुती कार (एमएच १५, ईबी ४९३३)ने आनंदवली येथे गेले होते. तेथून परतत असताना राष्ट्रवादी काँगेस पक्ष कार्यालयाजवळ मुंबई नाक्याकडून वडाळा नाक्याकडे विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या वॅगनर कार (एमएच १५, बीएक्स ७३२४)ने त्यांच्या कारला हुलकावणी दिली़ यामुळे मारुती कार उलटली व नाल्यात जाऊन कोसळली़ यामध्ये सर्वजण जखमी झाले असून, त्यातील अलीम शेख यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी वॅगनर कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़