चेतनानगरमध्ये पाच लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:14 AM2019-08-31T01:14:35+5:302019-08-31T01:14:54+5:30
बागातील चेतनानगर येथील घराला कुलूप असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे.
इंदिरानगर : बागातील चेतनानगर येथील घराला कुलूप असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चेतनानगरमधील पांडुरंग श्रीकांत परांजपे (६९) हे पुण्याला मुलाकडे गेले होते. एक महिन्यानंतर तेथून परत घरी (दि .२८) बुधवार रोजी परत आले. यावेळी त्यांनी दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला असता लाकडी कपाट उघडे दिसले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसला व त्यात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घराची पाहणी केली असता घराच्या किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघड समोर आले.