दोडी रुग्णालयास पाच लाखांचे औषध साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:46+5:302021-07-17T04:12:46+5:30

लाइफ गोज ऑन या संस्थेचे संस्थापक आदित्य काबरा व मानसी काबरा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तसेच सामाजिक जाणिवेतून आणि ...

Five lakh medicine supplies to Dodi Hospital | दोडी रुग्णालयास पाच लाखांचे औषध साहित्य

दोडी रुग्णालयास पाच लाखांचे औषध साहित्य

Next

लाइफ गोज ऑन या संस्थेचे संस्थापक आदित्य काबरा व मानसी काबरा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तसेच सामाजिक जाणिवेतून आणि दोडी ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी विजय पाटील यांच्या मागणीनुसार अ‍ॅडव्हान्सड बायो-अ‍ॅग्रोटेक लि. युनिटच्या वतीने सीएसआर फंडातून मदत करण्यात आली. कंपनीचे संचालक मुकुंद काबरा यांच्या वतीने लाइफ गोज ऑन संस्थेचे संस्थापक आदित्य काबरा, अ‍ॅडव्हान्सड् एन्इाईमचे असिस्टंट मॅनेजर अरविंद आरोटे यांच्या हस्ते दोडी बुद्रूक येथील ग्रामीण रुग्णालयास साहित्याचे औपचारिक प्रत्यार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कानवडे, डॉ. गिरीश भालेराव, डॉ. विजेंद्र सिंग, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी विजय पाटील आदींसह आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- १६ दोडी हॉस्पिटल

सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ग्रामीण रुग्णालयास औषध साहित्य सुपूर्द करताना आदित्य काबरा, अरविंद आरोटे, डॉ. शरद पाटील, डॉ. अक्षय कानवडे, डॉ. गिरीश भालेराव आदी.

160721\16nsk_21_16072021_13.jpg

फोटो- १६ दोडी हॉस्पिटल सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ग्रामीण रुग्णालयास औषध साहित्य सुपुर्द करताना आदित्य काबरा, अरविंद आरोटे, डॉ. शरद पाटील, डॉ. अक्षय कानवडे, डॉ. गिरीश भालेराव आदी.

Web Title: Five lakh medicine supplies to Dodi Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.