कापूस व्यापाऱ्याचे पाच लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:19+5:302020-12-31T04:15:19+5:30
----- चौकटपाडेला पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून मालेगाव : तालुक्यातील चौकटपाडे येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत चेतन उर्फ विजू पवार या तरुणाचा ...
-----
चौकटपाडेला पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
मालेगाव : तालुक्यातील चौकटपाडे येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत चेतन उर्फ विजू पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीही जखमी झाला आहे. चेतन पवार व विशाल गोकूळ शिंदे यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यांच्या कुटुंबात पुन्हा वाद झाले. यातून चेतन व विशाल यांच्यात हाणामारी झाली. विशालने चेतनवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याने घाव वर्मी लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित विशाल याला ताब्यात घेतले आहे. मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
मालेगावी कोरोनाबाधिताचा मृत्यू
मालेगाव : शहर व तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असताना मोतीबाग नाका भागातील ६० वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या संशयितावर येथील सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. सध्या महापालिका क्षेत्रात १४८ तर तालुक्यात १४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांचा रिकव्हरी रेट ९२.८२ टक्के आहे. महापालिका हद्दीत कोरोना बळींची संख्या आता १७४ झाली आहे. दरम्यान, इंग्लंडहून परतलेल्या ७ संशयितांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या ७ नागरिकांना प्रारंभी सहारा कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
-----
पवारवाडी भागात धाडसी चोरी
मालेगाव : येथील पवारवाडी भागातील महेवीनगर येथे राहणाऱ्या शेख अल्ताफ शेख इस्माईल यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोने व चांदीचे दागिने, दोन भ्रमणध्वनी असा ५३ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भोये हे करीत आहेत.