केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:58 PM2018-09-27T22:58:44+5:302018-09-27T22:59:19+5:30
कळवण : केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरू असलेल्या मदतकार्य व पूरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्या वतीने पाच लाख रूपयांचे आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे देण्यात आले.
Next

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त सभेत मान्यता घेऊन सामाजिक दातृत्वातून पाच लाख रुपये रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे यू. एम. नंदेश्वर यांनी सुपूर्द केला.