शहीद जवानाच्या कुंटूबियांना शिवसेनेकडून पाच लाखाची मदत
By admin | Published: February 20, 2016 09:49 PM2016-02-20T21:49:16+5:302016-02-20T21:58:26+5:30
शहीद जवानाच्या कुंटूबियांना शिवसेनेकडून पाच लाखाची मदत
चांदवड : तालुक्यातील भयाळे येथील शहीद जवान शंकर चंद्रभान शिंदे यास दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आल्याने शहीद जवानाच्या कुंटूबीयांला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २० रोजी शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप , जिल्हा प्रमुख विजय कंरजकर, माजी महापौर विनायक पांडे , महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जयंतजी दिंडे, तालुकाप्रमुख नितीन अहेर, माजी बांधकाम सभापती कारभारी अहेर, नगरसेवक शैलेश ढगे, सचिन मराठे,वडाळीभोई शहरप्रमुख प्रदीप अहेर, पिंटूशेठ संचेती, प्रशांत प्रजापत, राजाबाबा जाधव, सरपंच रविंद्र पुरकर दिलीप पुरकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी शिवसैनिक सुशील भालेराव यांनी शहीद जवान शंकर शिंदे यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे सांगीतले. तसेच वडाळीभोई येथील शिवसैनिक पिंटूशेठ संचेती यांनी पाच हजार रुपयाचा धनादेश दिला.
शिवसेनेने बोलले ते करुन दाखविले व नावातच सेना असल्याने शहीदाच्या मदतीस शिवसेना धावुन आली. याचा अभियान वाटतो अशी कृतज्ञता कुंटूबीयांतर्फे कैलास शिंदे यांनी व्यक्त केली (वार्ताहर)