सुवर्णकार परिचय मेळाव्यात पाच विवाह जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:26 AM2018-12-26T00:26:09+5:302018-12-26T00:26:31+5:30

नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात पाच वधू-वरांच्या लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली.

 Five marriages matched in Golden Star Introduction | सुवर्णकार परिचय मेळाव्यात पाच विवाह जुळले

सुवर्णकार परिचय मेळाव्यात पाच विवाह जुळले

Next

नाशिक : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात पाच वधू-वरांच्या लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. विवाहावर होणाऱ्या अनाठायी खर्चास फाटा देऊन पालकांनी सामुदायिक विवाह सोहळ्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी यांनी यावेळी सांगितले.  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर विसपुते, कार्याध्यक्ष भगवंत दुसानीस, चारुहास घोडके, रवींद्र जाधव, प्रसन्ना इंदोरकर, सुरेश बागुल, प्रकाश थोरात, योगेश दुसानीस, राजेंद्र दुसाने, विनोद खरोटे उपस्थित होते.
या मेळाव्यास अहिर सुवर्णकार समाजाचे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशमधील वधू-वरदेखील सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संतोष सोनार, उल्हास वानखेडे, सुनील बाविस्कर, दिलीप दाभाडे, योगेश दंडगव्हाळ, किशोर दाभाडे, आदी उपस्थित होते. मेळाव्यात वधू-वरांच्या पालकांनी एकमेकांचा परिचय करून घेतला.

Web Title:  Five marriages matched in Golden Star Introduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.