अमेरिकेतून पाठवली पाच लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:59 PM2020-04-03T18:59:48+5:302020-04-03T19:00:08+5:30
लासलगाव येथील भूमिपुत्र व अमेरिका (कॅलिफोर्निया) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले योगेश कासट यांनी आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवीत पेठ तालुक्यातील दुर्गम भागात सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनास साद दिली आहे.
लासलगाव : येथील भूमिपुत्र व अमेरिका (कॅलिफोर्निया) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले योगेश कासट यांनी आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवीत पेठ तालुक्यातील दुर्गम भागात सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनास साद दिली आहे. कासट यांनी १०० कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू व किराणा मालासाठी पाच लाख रु पयांची मदत पाठवली आहे. फोरमने वस्तू वाटप करण्यास सुरुवात केली आहे. किराणा साहित्य वाटपासाठी सरपंच, सदस्य तसेच गटविकास अधिकारी, जि. प. सदस्य व स्थानिकांची मदत घेतली जात आहे. योगेश कासट, हैदराबादचे राहुल मेहता, संकेत शाह, संदीप शुक्ल, जेसन हे सर्व लियल डायनामिक या कंपनीत कार्यरत आहे. त्यांनी सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मदत केली आहे.