पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने सव्वा पाच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 02:35 PM2020-03-10T14:35:35+5:302020-03-10T14:39:50+5:30
पेटीएम अॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांनाही फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत अज्ञात इसमाने पेटीएम केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे भासवणून क्वीक सपोर्ट, एनी डिस्क व इतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व इतर तक्रारदारांचे खात्यातून परस्पर मोठी रक्कम काढून घेत फसवणूक केली
नाशिक : पेटीएम अॅप अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून एका अज्ञात इसमाने तिडके कॉलनीतील एका व्यक्तीला सव्वा पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथील सुपुश्य हाईट्समधील एका व्यक्तीला अज्ञात इसमाने फोन व इंटरेटद्वारे त्याचप्रमाणे घरी येऊन पेटीएम अपडेट करण्याची वेगवेगळी कारणे सांगून २ लाख २६ हजार ११० रुपयांचे ऑनलाईन इंटरनेटचे ट्रान्झेक्शन करून आर्थिक फसवणूक केली, या प्रकरणात पोलीसांनी फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवले असून फसवणूक करणाºया अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या प्रकरणात मुंबईनाका परिसरातील अभिजित जयवंतराव शिंदे (४२)यांनाही फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत अज्ञात इसमाने पेटीएम केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे भासवणून क्वीक सपोर्ट, एनी डिस्क व इतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून फिर्यादी व इतर तक्रारदारांचे खात्यातून परस्पर मोठी रक्कम काढून घेत फसवणूक केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.