मुद्रणालयातून पाच मिलियन नोटा रवाना

By admin | Published: November 12, 2016 01:59 AM2016-11-12T01:59:40+5:302016-11-12T02:01:55+5:30

मुद्रणालयातून पाच मिलियन नोटा रवाना

Five million pieces of note off the printing press | मुद्रणालयातून पाच मिलियन नोटा रवाना

मुद्रणालयातून पाच मिलियन नोटा रवाना

Next

नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातून नवीन छापलेल्या ५०० रुपयांच्या पाच मिलियन (५० लाख) नोटा रवाना करण्यात आल्या आहे.
केंद्र शासनाने नवीन ५०० रुपयाची नोट छापण्याचे काम २० दिवसांपूर्वी चलार्थपत्र मुद्रणालयात दिले होते. तीन दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने पाचशे व एक हजाराच्या चलनातील नोटा रद्द ठरविल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आपल्या जवळील ५०० व एक हजाराच्या नोटा बॅँकेत जमा करण्यासाठी दोन दिवसांपासून रांगेत तासन्तास उभे आहेत.
चलार्थपत्र मुद्रणालयात नवीन छापुन झालेल्या ५०० रुपयाच्या ५ मिलियन (५० लाख) नोटा शुक्रवारी कारखान्यातुन रिझर्व्ह बॅँकेकडे रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन नोटा छपाईच्या कामालादेखील लागलीच सुरुवात करण्यात आली आहे. ५०० व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने इतर दरांच्या नोटांचा सर्वत्र मोठा तुटवडा भासत आहे.
नाशिकरोड मुद्रणालयात छापलेल्या नवीन ५ मिलियन नोटा या रिझर्व्ह बॅँकेकडे रवाना करण्यात आल्याने त्या लवकरच चलनात येणार असल्याने इतर नोटांच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेला गोंधळ कमी होण्यास हातभार लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five million pieces of note off the printing press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.