युवा महोत्सवाच्या लोगो अनावरणासाठी पाच मंत्री नाशकात
By Sandeep.bhalerao | Published: January 5, 2024 03:15 PM2024-01-05T15:15:12+5:302024-01-05T15:15:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या महोत्सवाकडे लागले आहे.
नाशिक: नाशिकमध्ये येत्या १२ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा लोगो आणि स्लोगन अनावरण सोहळा शुक्रवारी (दि. ५) होत असून या सोहळ्यासाठी राज्यातील पाच मंत्री, केंद्रातील एक मंत्री उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील ऑनलाईन हजेरी लावणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या महोत्सवाकडे लागले आहे. केंद्र आणि राज्यसरकारचे या कडे बारकाईने लक्ष असून नियोजनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री या सेाहळ्याच्या कामकाजाचा आढावा घेत असल्याने नाशिकमधील मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत.
युवा महोत्सवाच्या लोगो अनावरणाच्या निमित्ताने महोत्सवाचा बिगुल वाजणार असल्याने नाशिकमध्ये हा ग्रॅन्ड अनावरण सोहळा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. यासाठी सकाळपासून संपुर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. दुपारी तीन वाजेनंतर सोहळ्यासाठी मंत्र्यांचे नाशिकमध्ये आगमन होण्यास सुरूवात होणार आहे.