CoronaVirus नाशिककरांसाठी धोक्याची घंटा! आज आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 01:00 AM2020-04-10T01:00:17+5:302020-04-10T01:15:20+5:30
नाशिकमध्ये यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२ झाली असून यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : नाशिकमधील मालेगाव निफाड चांदवड या तीन तालुक्यांमध्ये कोरोणाचा शिरकाव झालेला पहावयास मिळत आहे तसेच नाशिक शहरात देखील करणारे एंट्री मारलेली आहे नाशिकमध्येमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या गुरुवारी रात्री आलेल्या तपासणी अहवालानंतर एकूण बारा झाली. बुधवारी (दि.8) मालेगाव मध्ये आढळून आलेल्या 5 कोरोनाबधितांपैकी एकाचा मृत्यू झाला. यामध्ये नऊ रुग्ण हे मालेगावमधील रहिवासी असून चांदवड, निफाड आणि नाशिक शहरामधील प्रत्येकी एक असे एकूण 12 रहिवासी कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.
मागील चार दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरूना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने आता नाशिक करांची चिंता पडली आहे जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून मालेगाव सह चांदवड तालुक्यात देखील आता उपायोजना राबविला जात आहे अचानकपणे बाधित रुग्णांचा आकडा समोर येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने शुक्रवारपासून ग्रामीण भागासह नाशिकमध्ये संचारबंदी अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे मालेगाव संपूर्णतः लोक लावून देखील होण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे मालेगाव सहरा सध्या अत्यावश्यक सेवा प्रशासनाकडून सुरू ठेवण्यात आलेले आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहेत. तरीदेखील नागरिकांची वर्दळ ही सुरूच असून प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक शहरात आता मास्क वापरणे प्रत्येकाला सक्तीचे देखील केलेले आहे तसेच जिल्ह्यात देखील मास्कची सक्ती असल्याचे अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. गुरुवारी पाठविण्यात आलेल्या मालेगाव मधील 40 नमुन्यांपैकी रात्री उशिरा पाच नमुने पुणे येथील प्रयोगशाळेने पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविला त्यामुळे मालेगाव मध्ये भाजीत रुग्णांची संख्या आता दहा झाली आहे या आजाराने नाशकात एकाचा बळी घेतला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहे केवळ नाशिकच्या ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्ये देखील कोरण्याचा एक रुग्ण मिळाला आहे. हा घडवून आलेल्या पाच रुग्णांमध्ये एक रुग्ण ज्येष्ठ नागरिक तर उर्वरित चौघे हेच पस्तिशीच्या तील तरुण आहेत अशी माहिती जगदाळे यांनी दिली नाशिक शहरातील नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे तसेच निफाड चांदवड मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये ही काटेकोर पणे संचारबंदीचे पालन प्रत्येकाने करणे हिताचे ठरणार आहे.