शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:19 AM2019-02-11T00:19:43+5:302019-02-11T00:21:20+5:30

महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.

Five murderous assassinations in city | शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

शहरात महिनाभरात विविध ठिंकाणी पाच खून

Next
ठळक मुद्देधक्कादायक : कायदासुव्यवस्था धोक्यात; व्यावसायिकासह एक तरुणी, तीन तरुणांची हत्या

नाशिक : महिनाभरापासून नाशिक शहरामधील कायदासुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. दि. ८ जानेवारी ते दि.९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्याने नाशिककर धास्तावले आहेत. पोलिसांकडून संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली जात असली तरी खुनाच्या घटना रोखण्यास अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.
नवे वर्ष उजाडले आणि आठवडा उलटत नाही तोच नाशिककरांच्या कानी इंदिरानगर भागात व्यावसायिकाच्या खुनाची घटना आली. ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या या परिसरात सहा लाखांची रोकड लुटून नेत एका मॉलच्या मालकाची संशयितांनी निर्घृण हत्या केल्याची गंभीर घटना घडली. पोलीस यंत्रणाही या घटनेनी तितकीच हादरली आणि तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, पंचवटी पोलीस ठाण्यांकडून या खुनाचा समांतर तपासाला गती दिली गेली. तपासाची चक्रे फिरत नाही तोच दुसऱ्या दिवशी दि. ९ जानेवारीला कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या टेरेसवर तरुणीचा मृतदेह गंगापूर पोलिसांना आढळून आला. १८ ते २० वयोगटांतील या तरुणीची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे तपासात उघड झाले. त्याच्या मुसक्या पंचवटी पोलिसांकडून आवळल्या गेल्या. या घटनेला चार दिवस पूर्ण होत नाही, तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजमाळ भागात क्षुल्लक कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून युवकाला मकरसंक्रांतीच्या रात्री ठार मारले.
आत्येबहिणीच्या हळदीला आला असता तेथे टोळक्याचे भांडण सुरू असल्याचे लक्षात आल्याने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागात टोळक्याने युवकाची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना रविवार, दि. २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. . या गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोच पुन्हा आठवडाभराने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सिडकोमधील गजबजलेल्या चौकात उभ्या असलेल्या एका युवकाला दोघांनी दुचाकीवरून येत भोसकल्याची घटना शुक्रवारी (दि.८) घडली.
खूनसत्र सुरूच, पोलीस हतबल; गुन्हेगारी टोळ्याही अस्तित्वात
शहरात महिनाभरात पाच खून झाले असून, जणू नव्या वर्षासोबत शहरात खूनसत्रास आरंभ झाला की काय? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. लागोपाठ शहरात खुनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे नाशिककर चांगलेच धास्तावले आहेत. सातत्याने घडणाºया खुनाच्या घटना रोखण्याचे पोलीस आयुक्तालयापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
४शहरात केवळ खून सत्र सुरु आहे असे नव्हे तर भर रस्त्यात खुलेआम टोळीयुद्ध भडकल्याचे दिसते. गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात आल्याचे पोलीस सांगत असले तरी शहरातील अनेक भागात भाईगिरी करणाºया टवाळ्यांच्या टोळ््या स्थापन झाल्या आहेत.

Web Title: Five murderous assassinations in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.