दिंडोरी तालुक्यात पाच नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:40 PM2021-03-10T20:40:54+5:302021-03-11T01:16:03+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, बाधितांचा आकडा १६२४ वर जाऊन पोहोचल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी (दि.१०) सहा नवीन कोरोनाबाधित आढळून आले.

तालुक्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५३० इतकी असून, सध्या ४६ रुग्ण उपचार घेत आहेत तर, आजवर ४८ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, बुधवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये दिंडोरी तालुक्यातील भनवड येथील ३६ वर्षीय पुरुष, सोनजांब येथील ७३ वर्षीय पुरुष, दिंडोरी येथील ५३ वर्षीय पुरुष, दिंडोरी येथील ७५ वर्षीय पुरुष, वणी येथील ३८ वर्षीय महिला व वणी येथील ६७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून, नियमांचे पालन करण्यासाठी उपाययोजनांना अग्रक्रम देण्यात आला आहे.