वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:39 AM2017-10-25T00:39:39+5:302017-10-25T00:39:51+5:30
पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात अधिकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आॅन ड्यूटी गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाºयासह कर्तव्यात कसूर करणाºया पाच परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या साºया प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये सदर कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात अधिकारी व कर्मचाºयांच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आॅन ड्यूटी गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाºयासह कर्तव्यात कसूर करणाºया पाच परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या साºया प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये सदर कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सोमवारी (दि.२३) पंचवटीतील मायको रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयासह कोणीही कर्मचारी हजर नसल्याने वेळेवर मदत न मिळल्याने एका महिलेची प्रसूती रिक्षातच झाली होती. या साºया प्रकाराची गंभीर दखल घेत वैद्यकीय विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती चिरमाडे यांना चौकशी करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, डॉ. चिरमाडे यांनी आपला अहवाल वैद्यकीय अधीक्षकांना सादर केला आहे. या चौकशी अहवालानुसार, सदर महिला सर्वप्रथम सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात आली होती परंतु, इन्चार्ज सिस्टर श्रीमती सरला रुपवते यांनी तिची तपासणी करून घरी पाठवून दिले आणि पोटात कळा येतील त्यावेळी पुन्हा येण्यास सांगितले. त्यानुसार, दुपारी पुन्हा महिला रुग्णालयात आली असता वैद्यकीय अधिकाºयासह आया, कर्मचारी कुणीही तेथे हजर नव्हते. सुरक्षा रक्षक रुग्णालयाच्या गच्चीवर पतंग उडविण्यात मश्गुल होता.
सुरक्षा रक्षकांच्या बडतर्फीची शिफारस
मायको रुग्णालयात एक पुरुष व एक महिला सुरक्षा रक्षक आहेत. सदर घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक भरत गायकवाड हा रुग्णालयाच्या गच्चीवर पतंग उडवित होता तर महिला सुरक्षा रक्षक लक्ष्मी निकम या जेवणासाठी घरी गेल्या होत्या. सदर कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या बडतर्फीची शिफारस वैद्यकीय अधीक्षकांनी प्रशासन उपआयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, श्रीमती भारती कोठारी व श्रीमती ए. के. देशमुख या कुठलाही अर्ज न देता गैरहजर होत्या. मात्र, आॅन ड्यूटी त्या गायब होत्या की त्यांची नेमणूक अन्य कोठे होती, याचीही चौकशी केली जाणार आहे.
चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या आदेशान्वये वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह श्रीमती भारती कोठारी, श्रीमती ए. के. देशमुख, श्रीमती मनीषा शिंदे, श्रीमती सरला रुपवते, श्रीमती एम. एम. ठाकूर या परिचारिकांच्या निलंबनाचे आदेश काढले.