सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:10 PM2020-05-30T23:10:34+5:302020-05-30T23:57:26+5:30
सिन्नर तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिन्नर : तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुक्यतील दापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह निघाले. दापूर येथील नागरिकांना मुंबई येथून आणणारा गुळवंच येथील टॅक्सीचालक शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर दापूर येथील रुग्णाच्या संपर्कातील ९०वर्षीय वृद्धही कोरोना पॉझिटिव्ह आला. गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबई येथून फुलेनगर (माळवाडी) येथे आलेला ५४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील ३७ व ३९ वर्षीय महिला व २२ वर्षीय युवकही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे.
आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, २१ जणांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. नाशिक येथून पाच तर सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून चार रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तालुक्यात २२ कंटेन्मेंट झोन आहेत.