जुन्या नाशकातील पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:10 PM2020-06-20T23:10:22+5:302020-06-20T23:10:45+5:30

नाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.

Five people died in Old Nashik | जुन्या नाशकातील पाच जणांचा मृत्यू

जुन्या नाशकातील पाच जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देउद्रेक कायम । महापालिकेने नेमला ‘टास्क फोर्स’

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील कोरोनाचा उद्रेक कायम असून, बाधितांपेक्षा मृत्यूने अधिक उग्ररूप धारण केले आहे. शनिवारी (दि.२०) एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ५६ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केला आहे, तर दुसरीकडे जुन्या नाशकात आणि अन्यत्रही खासगी डॉक्टरांच्या मदतीने ज्ञात नसलेले कोरोना संशयित शोधण्यासाठी सोमवारपासून (दि.२२) मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरात ४९ बाधित आढळल्याने रुग्णसंख्या अकराशेच्या पार गेली आहे, तर एकाच दिवसात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण जुने नाशिक परिसरातील होते. बुधवारपेठ भागातील एका ४५ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल १४ जून रोजी प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे कथडा येथील फकीरवाडी येथील महिलेचा ती बाधित असल्याचा अहवालदेखील १५ जून रोजी प्राप्त झाला होता, तर नानावली येथील ६५ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचा अहवाल १९ जून रोजी प्राप्त झाला होता. तसेच भद्रकाली फ्रुट मार्केट येथील महिला आणि कोकणीपुरा येथील ६५ वर्षीय वृद्धाचादेखील मृत्यू झाला आहे.
मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाकडून दखल घेऊन मृत्यूचा दर कमी करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून, तज्ज्ञांच्या सूचनांसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.रुग्ण शोधण्याची मोहीमदुसरीकडे जुने नाशिक, पंचवटीतील पेठरोड तसेच अन्य भागांतील फॅमिली फिजिशियन्स, होमीओपॅथी, युनानी तसेच अन्य पॅथीच्या स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला असून, त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे उपचार घेण्यासाठी रुग्ण येत आहेत, त्यांच्यात कोणती लक्षणे आढळली आहेत. याची यादी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याआधारे येत्या सोमवारपासून (दि.२२) ज्ञात नसलेली परंतु लक्षणे असलेली सर्व रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ज्ञात नसलेले रुग्ण शोधण्यात येणार असून, दिवसाला किमान पाचशे स्वॅब घेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील एका लॅबकडून तीनशे स्वॅब तपासून दिले जाणार आहेत. याशिवाय टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके,
वैद्यकीय अधीक्षक, मनपा

Web Title: Five people died in Old Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.