मालेगांवातील पाच पावरलूम मालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 08:45 PM2020-04-06T20:45:01+5:302020-04-06T20:47:39+5:30

नाशिक : मालेगावात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग अर्थातच पावरलूम सुरू असल्याने संबंधित पावरलूमवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाºयाची तडकाफडखी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानीशा करण्यात आली आहे. याबाबत पाच पावरलूम मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

Five Powerloom owners in Malegaon sued | मालेगांवातील पाच पावरलूम मालकांवर गुन्हा दाखल

मालेगांवातील पाच पावरलूम मालकांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसंबंधित पोलिस अधिकाºयांवर कारवाई केली आहे.

नाशिक : मालेगावात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग अर्थातच पावरलूम सुरू असल्याने संबंधित पावरलूमवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाºयाची तडकाफडखी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानीशा करण्यात आली आहे. याबाबत पाच पावरलूम मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
दरम्यान, संबंधित पोलिस अधिकाºयाने आपले कार्यक्षेत्र नसतानाही त्या पावरलूममध्ये जावून तेथील मजुरांना मारहाण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मालेगाव येथील एकही पावरलूम सुरू नसल्याचेही मांढरे यांनी कळविले आहे.
काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील काही पावरलूम सुरू आहेत, अशा पद्धतीची तक्र ार प्राप्त झाली होती. लोकांनी असेही सांगितले की पावरलूम बंद करण्याकरिता काही पोलिस तेथे आले होते. मात्र त्या पावरलूमवर कारवाई होण्याऐवजी संबंधित पोलिसांचीच बदली करण्यात आली, अशीही माहिती पसरविण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. ते पोलिस अधिकारी आपले कार्यक्षेत्र सोडून दुसºया कार्यक्षेत्रातील पावरलूमवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
त्या ठिकाणी त्यांना दोन मजूर आढळले. त्यांनी त्या मजुरांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मालेगाव पोलिस उप अधीक्षकांनी संबंधित पोलिस अधिकाºयांवर कारवाई केली आहे. आपले क्षेत्र सोडून कामगारांना, मजुरांना मारहाण करण्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे. तसेच सध्या मालेगाव येथील कोणतेही पावरलूम सुरू नसून, पाच पावरलूमवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
मालेगावमध्ये पोलिस विभागाचे संचारबंदीत नियंत्रण असून, कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर निश्चितच कारवाई केली जाईल असे मांढरे यांनी कळविले आहे. नागरिकांनीही आपल्या एखाद्या चुकीमुळे कोरोनाचे रु ग्ण वाढतील असे कोणतेही वर्तन करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

Web Title: Five Powerloom owners in Malegaon sued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.