मद्यधुंद दुचाकीचालकाच्या धडकेने पाच गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:57+5:302021-07-11T04:11:57+5:30
नांदगाव : नांदगाव मालेगावरोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ शनिवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ...
नांदगाव : नांदगाव मालेगावरोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ शनिवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एक महिला व एका मुलाचा, तीन पुरुषांचा समावेश आहे. टॅक्सीचालकाच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मद्याच्या नशेत एमएच १९ /एसी ५३४९ या हिरो होंडा दुचाकीवरील दोघेजण नांदगावहून मालेगावला जात होते. विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीकीस (क्रमांक एम एच ४१/बी पि ७३५८) जबर धडक दिल्याने त्यावरील संजयसिंग गबा वाघ (४८), ललिता वाघ (४३) व त्यांचा १२ वर्षांचा मुलगा (रा. घोडेगाव, ता. मालेगाव) गंभीर जखमी झाले. तिघे नस्तननपूर नांदगाव येथे धार्मिक कार्याला चालले होते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजता टॅक्सी चालक भाऊसाहेब सोनवणे घटनास्थळी आले. त्यांनी गोकुळ पडूळ,भरत पडूळ या दॊघा शेतकऱ्यांना मदतीला बोलवले व १०८ क्रमांकावर संपर्क साधून जखमींना गाडीत टाकून मालेगाव येथे हलविले. दि ७ जुलै रोजी नांदगांव मालेगाव रस्त्यावर कंटेनरचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना ताजी असताना चार दिवसांच्या फरकाने अपघात झाला. पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, सपोनि दीपक सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भूषण आहिरे, राजू मोरे करत आहे.
------------------
नांदगाव मालेगाव रस्त्यावर पंचमुखी हनुमान मंदिरनजीक अपघातग्रस्त दुचाकी. (१० नांदगाव ॲक्सिडेंट)
100721\10nsk_45_10072021_13.jpg
१० नांदगाव ॲक्सीडेंट