दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 06:17 PM2018-10-11T18:17:10+5:302018-10-11T18:18:01+5:30

मालेगाव शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले

Five suspected criminals arrested for the robbery | दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक

Next

मालेगाव : शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर परिसरात पाच जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेलसमोरील टेकडीलगत सराईत गुन्हेगार मोहंमद शहेबाज मोहंमद युसुफ उर्फ कमांडो रा. गोल्डननगर, बिलाल अहमद मोहंमद अजमल अन्सारी रा. बाग-ए-मोहंमद, राशीदअली कासमअली उर्फ पोली रा. रजापुरा चौक, मुशीरअली नुरअली रा. जाफरनगर, शहेबाज अहमद अब्दूल हाफीज रा. गोल्डननगर हे पाचही जण दुचाकी लावून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. यावेळी पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल, पोलिस हवालदार जनार्दन खैरनार, विनायक जगताप, दिपक फुलमाळी, महेंद्र पारधी, हितेश भामरे, मयुर भावसार, अतुल पवार आदिंच्या पथकाने छापा टाकला. पोलीस आल्याचे बघून पाचही जणांनी पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन पाचही जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक तलवार, तीन चाकू, एक चायनिज चॉपर, मिरची पावडर, दोन लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल, दोन दुचाकी आदि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार मोहंमद शहेबाज मोहंमद युसुफ उर्फ कमांडो याच्यावर यापूर्वी देखील दहशत माजविणे, दरोड्याचा प्रयत्न आदि गुन्हे दाखल आहेत. शहरातील गुन्हेगारीचे मुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर आहे. जमिन फसवणूक, सायझिंग व यंत्रमागधारकांना काही जणांकडून खंडणीच्या धमक्या दिल्या जात आहेत. संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. १३ गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे, पवारवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आदि उपस्थित होते.
पवारवाडी पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घेतल्यानंतर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. तरूणांना व्यसनाच्या आहारी नेणाºया कुत्ता गोळीच्या तीन छापे त्यांनी टाकले आहेत. तसेच एक गावठी कट्टा, एक जीवंत काडतुस, देशीदादा खून प्रकरणातील संशयितांना अटक, संशयित गुन्हेगारांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या पाचही सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पवारवाडी पोलिसांना यश आले आहे.
 

Web Title: Five suspected criminals arrested for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.