पाच संशयितांची कारागृहात रवानगी

By admin | Published: October 15, 2016 01:54 AM2016-10-15T01:54:02+5:302016-10-15T01:54:52+5:30

पाडळी फाटा : वकिलासह चार विद्यार्थ्यांचा समावेश

Five suspects sent to jail | पाच संशयितांची कारागृहात रवानगी

पाच संशयितांची कारागृहात रवानगी

Next

 नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी फाटा येथील दंगलप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी रविवारी (दि़ ९) संशयित म्हणून एका वकिलासह, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील चार विद्यार्थ्यांना अटक केली होती़ तर एका वकिलास रबरी बुलेट लागल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे़ पोलिसांनी अटक केलेल्या या पाचही संशयितांची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली असून, उर्वरित आणखी चार संशयित वकिलांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़
इगतपुरी तालुक्यातील अ‍ॅड़ पंढरीनाथ भिकाजी गायकर (३२, रा. खैरगाव, ता़ इगतपुरी),अ‍ॅड हनुमान देवराम मराडे (३०, मु़ पो़ वाकी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुनील विलास काळे (३१, मु़ पो़ घोटी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुनील निवृत्ती कोरडे (३१, मु़ पो़ गिरणारे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुशील शिवाजी गायकर (३०, मु़ पो़ वाघेरे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक ) व अ‍ॅड़ भारत पंढरीनाथ कोकणे (मु़ पो़ कोरपगाव, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) हे वणी व सापुतारा येथे फिरण्यासाठी गेले होते़
वणीहून घरी परतत असताना महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांनी गाडी घोटीच्या दिशेने वळविली़ पाडळी फाट्यावर हे सर्व जण पोहोचले अन् त्याचवेळी तेथील जमावाने दगडफेक तर पोलिसांनी रबरी गोळीबार सुरू केला़ या प्रकारामुळे घाबरलेल्या वकिलांनी गाडीतून पळ काढला असता अ‍ॅड़ पंढरीनाथ गायकर यांच्या पाठीस एक गोळी लागल्याने ते जखमी झाले, तर उर्वरित पाच जणांपैकी अ‍ॅड़ भारत कोकणे व सहलीसाठी गेलेले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी समाधान मोहन वारुंगसे (२०, मु़ पो़ गोंदे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), विष्णू ज्ञानेश्वर उगले (२१, रा़ समनेरे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), प्रकाश गंगाधर चौधरी (२२, रा़ पाडळी देशमुख, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), नामदेव तुकाराम शिंदे (२०, रा़ दवडत, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) यांना अटक केली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Five suspects sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.