महापालिका हद्दीत पाच हजार मुलांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:33 AM2018-11-28T00:33:54+5:302018-11-28T00:34:45+5:30

मिझल रु बेला लसीकरण कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते म्हसरूळ मनपा शाळा क्र मांक एक येथे करण्यात आले. या कार्र्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आयुक्त राधाकृष्णन, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील आदींबरोबरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे, शाळेच्या मुख्याध्यापक लीलावती गायकवाड उपस्थित होते.

 Five thousand children in the municipal limits | महापालिका हद्दीत पाच हजार मुलांना डोस

महापालिका हद्दीत पाच हजार मुलांना डोस

Next

नाशिक : मिझल रु बेला लसीकरण कार्यक्रम महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून, महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते म्हसरूळ मनपा शाळा क्र मांक एक येथे करण्यात आले. या कार्र्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी आयुक्त राधाकृष्णन, स्थायी
समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील आदींबरोबरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे, शाळेच्या मुख्याध्यापक लीलावती गायकवाड उपस्थित होते.
सदरची मोहीम पुढील पाच आठवडे राबविण्यात येणार असून, त्यापैकी तीन आठवडे शालेय लसीकरणामध्ये व उर्वरित दोन आठवडे बाह्य लसीकरण सत्रांमध्ये म्हणजे अंगणवाडी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र इ. ठिकाणी दिली जाईल. त्याचप्रमाणे पुढील पाच आठवडे मनपा अंतर्गत सर्व रु ग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये नियोजित लसीकरण सत्रांद्वारे ही लस दिली जाणार आहे. महानगरपालिकेतील आरोग्य पथक या सर्व ठिकाणी जाऊन नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांना गोवर-रु बेला लस देणार आहे. मंगळवारी (दि.२७) पहिल्याच दिवशी शाळा व नियोजित लसीकरण सत्रे मिळून एकूण पाच हजार ३७० मुलांना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील पाल्यांना लस देऊन गोवर-रु बेला या रोगाच्या निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

Web Title:  Five thousand children in the municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.