निकवेलमध्ये दारू पिणाऱ्यास पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:04 AM2018-08-08T00:04:01+5:302018-08-08T00:06:53+5:30
निकवेल : येथे मंगळवारी (दि.७) सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . व गावात जो दारू पिलेला आढळेल त्याला ५,००० रु. दंड करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेत आदिवासी महिलांच्या पुढाकाराने झालेल्या या ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
निकवेल : येथे मंगळवारी (दि.७) सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावात दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . व गावात जो दारू पिलेला आढळेल त्याला ५,००० रु. दंड करण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.
ग्रामसभेत आदिवासी महिलांच्या पुढाकाराने झालेल्या या ग्रामसभेत गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. रोजगाराचे कोणतेही साधन नसताना मजुरीसाठी महिलांना दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात. त्यातच गावात दारूची विक्र ी मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. घरातील कर्ता पुरु ष दारूच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबाचा भार महिलांवर पडत आहे.
दारूसाठी शेजारच्या गावातील मद्यपीदेखील येऊ लागल्याने गावातील शांतता बिघडल्याचे महिलांचे म्हणणे आहे. युवा पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे अवैध दारू विक्र ीला त्वरित आळा घालावा अशी मागणी महिलांनी ग्रामसभेत केली. निकवेल येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू विक्र ीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.
त्यामुळे आदिवासी महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला जे गावठी दारूचा व्यवसाय करतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्याजवळची दारू व दारू गाळण्याचे साहित्य जमा केले. जे पुन्हा दारू विक्र ीचा व्यवसाय करतील त्यांना १०,००० रु . दंड व गावात जो दारू पिलेला आढळला तर त्याला ५,००० रु. दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच चित्रा मोरे, उपसरपंच मुरलीधर वाघ, पोलीसपाटील विशाल वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा महाजन, ग्रामव्यवस्थापन समिती सदस्य संजय सोनवणे, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मोरे, तात्या मोरे, दादा माळी, रामू अनारे, बंटी म्हसदे, सोमनाथ बच्छाव, किरण वाघ, देवा वाघ व आदिवासी महिला, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.गावात दारूबंदी करावी यासाठी महिलांनी मागणी केल्यामुळे विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीबाबतचा ठराव महिलांनी मांडला, तो आम्ही एकमताने मंजूर केला व गावात पूर्णपणे दारूबंदी केली आहे.
- चित्रा मोरे, सरपंच निकवेल