पाच हजार चिंचोक्यांचा श्रीगणेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:51 AM2017-08-30T00:51:52+5:302017-08-30T00:51:58+5:30
पर्यावरणाला कोणताही धोका पोहचू नये तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून पंचवटीतील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया सदनिकेतील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही जवळपास पाच हजार चिंचोक्यांपासून गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली देखावा साकारून पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे. मंडळाने आतापर्यंत बांगड्यांचा गणेश, बांबूपासून गणेश, फळे, फुले, चॉकलेट, कुंड्या, गूळ आदी वस्तूंपासून गणेशमुर्ती साकारून इको फ्रेंडली देखावे सादरीकरण केले आहे. इको फ्रेंडली देखावे साकारण्याचे मंडळाचे यंदा १९ वे वर्ष आहे.
पंचवटी : पर्यावरणाला कोणताही धोका पोहचू नये तसेच ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा म्हणून पंचवटीतील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया सदनिकेतील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही जवळपास पाच हजार चिंचोक्यांपासून गणेशाची मूर्ती साकारून इको फ्रेंडली देखावा साकारून पर्यावरण बचावचा संदेश दिला आहे.
मंडळाने आतापर्यंत बांगड्यांचा गणेश, बांबूपासून गणेश, फळे, फुले, चॉकलेट, कुंड्या, गूळ आदी वस्तूंपासून गणेशमुर्ती साकारून इको फ्रेंडली देखावे सादरीकरण केले आहे. इको फ्रेंडली देखावे साकारण्याचे मंडळाचे यंदा १९ वे वर्ष आहे. पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वत:च विविध वस्तूंपासून गणेशाची मूर्ती तयार करतात. ध्वनिक्षेपकाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मंडळाकडून कोणतेही वाद्य वा ध्वनिक्षेपक न लावता गणेशोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मीछाया सदनिकेतील रहिवासी मंडळाचे सदस्य असून दरवर्षी आवश्यक तितकीच वर्गणी जमा करून देखावे साकारण्याचे काम केले जाते. मंडळाचे अनुप महाजन, सागर जाधव, उमेश ढगे, अविनाश वानखेडकर, हरी घोडके, अक्षय शिंदे, सुभाष राऊत, संकेत वाघ आदींसह सदनिकेतील सदस्य कामकाज बघतात.
होमगार्डच्या भरवशावर बंदोबस्त
नाशिक : उत्सव काळातील गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशमंडळांना पोलीस बंदोबस्त पुरविणे अपेक्षित आहे. मात्र सध्या काही मंडळांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला असताना काहींना मागणी करूनही बंदोबस्त देण्यात आलेला नाही. या मंडळांना अजूनही पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा आहे, तर शहरातील काही मंडळांना होमगार्ड बंदोबस्तासाठी देण्यात आलेले आहेत.